भुसावळातील कोटेचा महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार –

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने ज्ञानदान व शैक्षणिक उपक्रमांची कास धरून शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ९ मे २०२० रोजी एल. एम. एस. (लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम) हा विषय घेऊन महाविद्यालयातील आय.क्यू.सी. व अक्षरा मल्टीडिसिप्लिनरी रीसर्च जर्नल यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.ऑनलाईन सेमिनारचे महत्त्व व उपयुक्ततेवर चर्चा
वेबिनार उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांनी सहभागी सर्व प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. सद्यस्थितीतील येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन सेमिनारचे महत्त्व व उपयुक्तता यावर त्यांनी चर्चा केली. शिक्षण क्षेत्रातील विविध कानाकोपर्‍यातून सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींनी सेमिनारमध्ये सहभागी होऊन त्यांच्या भागातील परीस्थितीसापेक्ष शैक्षणिक उपक्रमांवर आपली मते व्यक्त करावीत, असे आवाहन केले.
वेबिनार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सतीश देशपांडे (सहसंचालक जळगाव विभाग) यांनी उद्घाटनपर भाषणात कोविड १९ मुळे उदभवलेल्या ताळेबंदीच्या काळात महाविद्यालयाने एल.एम.एस.सारख्या विषयावर वेबिनारचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालय व आयोजकांचे कौतुक केले. याचा फायदा विद्यार्थी व प्राध्यापकांना नक्की होईल व अशा प्रकारचे उपक्रम इतर महाविद्यालयाने ही आयोजित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली व सहभागी सर्व प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.
ऑनलाईन युगात शिक्षकांनी ज्ञानार्जन करून ते विद्यार्थ्यांना देण्याची गरज मोहनीश महामुने ( असिस्टंट प्रोफेसर स्कूल ऑफ कम्प्यूटशेलन सायन्सेस, एस.आर.टी.एम.युनिवर्सिटी, नांदेड) यांनी रीसोर्सपर्सन म्हणून टेक्निकल सेशनमध्ये सहभाग प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. वेबिनारमुळे आपण स्पर्धेच्या युगात सक्षम व्हावे, भविष्यात शिक्षणपध्दती एल.एम.एम.या दिशेने पुढे जात आहे. पारंपरीक शिक्षणाला जोड देऊन वेबिनारच्या माध्यमातून पुढे जाता येते यावर त्यांनी भर दिला. आपल्या ऑनलाईन प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी स्लाईडच्या माध्यमातून एल. एम. एस म्हणजे काय ? ऑनलाईन क्लासेस कसे घ्यावेत ? व्हिडिओ, स्टडी मटेरीयल कसे तयार करावे ? ऑनलाईन टिटोरीयल कसे द्यावेत ? विद्यार्थ्यांचे शंकांचे निरसन कसे करावे ? गुगल क्लासरूम वर विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रम कसे करावेत इतर सखोल माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविली. हा ऑनलाईनचे युग असून प्रत्येक शिक्षकाने हे सर्व ज्ञान अवगत करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाचे प्रा.निलेश गुरुचल यांनी तांत्रिक सहाय्य दिले. डॉ.गिरीश कोळी यांनी संपादक म्हणून भूमिका बजावलली तर डॉ.जे.व्ही.धनवीज यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन
वेबिनारच्या उत्तरार्धात सहभागी प्राध्यापकांनी डॉ.मोहनीश महामुने यांना अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्षा पद्मा कोटेचा, मॅनेजमेंट प्रतिनिधी दीपेश कोटेचा, महाविद्यालय प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील इत्यादींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सदर वेबिनारसाठी महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, केरळ, गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, झारखंड, हरिद्वार इत्यादी ठिकाणाहून एकूण १२० प्राध्यापक सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *