जळगाव जिल्ह्यात उद्यापासून वाईन शॉप होणार सुरू ; मद्यप्रेमींसाठी खुशखबर ; सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक ;

जळगाव –
आता रेड झोनमध्ये असलेल्या जळगाव जिल्ह्यात मंगळवार ५ मे पासून वाईन शॉप सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परीषदेत दिली.
बियर बार, परमीट रूम यांना परवानगी नाकारण्यात आली असून सोशल डिस्टनिंग बरोबर एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाही हे नियम आता काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. तर तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये सलून, हॉटेल, बियरबार, परमीट रूम, मॉल, थिएटर, जीम, ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थांच्या गाड्या हे वगळता इतर सर्व दुकाने खुली करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणचे वाईन शॉप मंगळवारपासून उघडण्यास परवानगी असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *