जळगाव जिल्ह्याबाहेर अडकलेल्यांना शासनाने जिल्ह्यात परत आणावे – शिशिर जावळे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि विश्वावर कोरोणा विषाणूंच्या संक्रमणामुळे अनेक लोक बाधीत झाले आणि त्यामुळे हे प्रचंड संकट सर्वांवर कोसळले आहे.अशा परीस्थितीमध्ये लॉक डाऊनमुळे विविध राज्यातून, जिल्ह्यातून, शहरातून विविध क्षेत्रातली कामगार मजूर, कुटुंब, उद्योजक, अबाल वृद्ध ,स्त्रिया, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी त्यांच्या आवश्यक कामानिमित्त आपल्या राज्यातील विविध जिल्हे, शहर यामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यांना पुन्हा आपापल्या गंतव्य ठिकाणी घरी परतण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच अशा सर्वांना आपापल्या घरी परत जाण्यासाठी आवश्यक अटी आणि नियमांची पूर्तता करून त्या-त्या ठिकाणच्या संबंधित नोडल अधिकार्‍यांकडे अर्ज करून जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे.
यालॉक डाऊनमध्ये अडकलेले बरेचसे गोरगरीब मजूर मध्यमवर्गीय आहेत त्यांच्याकडे त्यांच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःचं वाहन नसल्याने ते सर्व यापासून वंचित राहणार आहेत आणि म्हणून जळगाव जिल्ह्यातील अशा सर्व वंचितांना, अडकलेल्यांना त्यांच्या शहर जिल्ह्यात राज्यात पाठविण्यासाठी शासनाकडून मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती व मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *