भुसावळ (प्रतिनिधी )-
देशामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे.अशा वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व कोरोनाच्या लढयात रुग्णाची ढाल बनून डॉक्टर,पोलीस, सफाई कर्मचारी हे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लढा देत आहे. या लढयात गावोगाव त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून हजारों समाजिक कार्यकर्ते आपआपल्या परीने सेवा देत आहे. याच अनुषंगाने निस्वार्थी सेवा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आधीच समाजसेवेचा वसा घेतलेले भुसावळ येथील साई भक्त नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता निर्मल कोठारी हे गरीब व गरजु यांच्या मदतीसाठी आजच्या या परिस्थितित गरीबांचे मसीहा ठरत आहे.गेल्या ४ दिवसांपूर्वी एक महिला आपल्या लहान मुलास हातावर घेवून जामनेर रोडने सैरभैर पळत होती तीच्या हातावर जखमी रक्तबंभाळ झालेले मूल होते ,त्याचे डोके फुटले होते खुप रक्तस्राव होत होता . सर्व परिसर सील असल्याने एकही दवाखाना उघडा नव्हता ,परंतु त्याच वेळेस अचानक समोरून येणाऱ्या पिंटू कोठारी यांनी हे दृश्य पाहिले व त्वरीत आपले मित्र डॉक्टर यांना संपर्क साधुन त्या मुलास हातावर घेवून दवाखान्यात नेले व त्याचे वर उपचार केल्याने त्या माऊली साठी देवदूत म्हणून फार मोलाचे सहकार्य केले .
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर स्वखर्चाने प्रभाग निरजंतुक करण्याकरीता सर्वत्र फवारणी केली .लॉक डाऊनच्या काळात अनेकांना काम नाही त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांची चांगलीच अडचन होत आहे . या गरजुंची गरज लक्षात घेवून त्यांना त्वरीत जीवनावश्यक वस्तु व सामग्री घरपोच देत आहे . त्याचप्रमाणे १००० ते १२०० लोकांची दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था करीत आहे.तसेच जे परप्रांतीय महामार्गावरुन पायी प्रवासा करीता निघालेल्या प्रवाश्यांसाठी स्वतंत्र शामियाना (मंडप) उभारण्यात आले आहे .
याठिकाणी जेवणासह त्यांच्या विश्रामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या परप्रांतीय प्रवाश्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असून नॉन कॉन्टेक्ट थर्मामिटरने तपासणी करवून घेत आहे. पायी चालतांना पायाला होणारा त्रास कमी होण्यासाठी औषध दिले जात आहे.
मे महीना त्यात भुसावळचे तापमान जवळपास ४३ डिग्रीवर पोहचले आहे. अशा या तापलेल्या वातावरणात डोक्याला पांढरा रुमाल बांधून मोटरसायकली वरून हा साई भक्त सेवेकरीता घराबाहेर बाहेर आहे . सोबत जेवणाचे पार्सल असलेली एक मारुती व्हॅन असते या दरम्यान जर कोणी पादचारी पायी येताना दिसल्यास आपली मोटरसायकल थांबवून त्यां अबालवृद्धानसह सर्वाना जेवण दिले जात आहे.एवढेच नव्हे तर ३० ते ४० परप्रांतीय असल्यास त्याना त्यांच्या गावी पोहचवीण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था निर्मल कोठारी करीत आहे. जो पर्यत मी जिवंत आहे तो पर्यत सेवा ही सुरू राहणार असा दृढ निश्चय कोठारी भाऊंचा आहे . कोठारिंचा आदर्श इतरही धनाढ्य नागरिकांनी सुद्धा नक्की घ्यावा असे म्हणत जिल्ह्यामध्ये सर्व समाजातर्फे तसेच प्रशासकीय अधिकारी,पोलीस अधिकारी यांनीसुद्धा निर्मल उर्फ पिंटू भाऊंचे कौतुक केले आहे. आपल्या गावी सुखरूप पोहचलेले परप्रांतीय फोन करून समाजसेवक निर्मल कोठारी यांचे रुपात आम्हाला देवदूत भेटले म्हणून आभार मानत आहे.
यासाई भक्ताने साईबाबांची शिकवण व उपदेश आचरणात आणून खऱ्या अर्थाने अन्नछत्र (भांडार ) सुरु केले आहे .या शहरात कित्येक करोडपती आहे .परंतु दिन दुबळ्याचा कैवारी म्हणून भुसावळ शहरासह अनेक ठिकाणी पिंटुभाऊच्या रुपात हा अवलिया मात्र गरजु गोरगरीबांसाठी अहोरात्र कार्यरत असतो . नेहमीच मदत करण्यासाठी अग्रेसर असलेले या
कोरोना लढयात कसे मागे राहणार बरे . निस्वार्थी सेवा हेच ध्येय माणून मदतकार्य करणारा हा दाता व त्याचे कार्यास सलाम ….



