भुसावळात अडकलेल्या परप्रांतियाची वैद्यकीय तपासणी ; पालिका रुग्णालयात लागल्या रांगा ; सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- परप्रांतीयाना आपल्या गावी जाण्यासाठी प्रशासनाने संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार तहसील कार्यालयात अर्ज मागविण्यात येत आहे . या परवानगी करीता दवाखान्यात तपासणी अत्यावश्यक आहे यासाठी भुसावळ येथील संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालया मध्ये सोमवार दिनांक ४ में रोजी वैद्यकीय तपासणीसाठी नागरिकांनी केस पेपर काढण्यासाठी रांगा लावून गर्दी केली होती तर दुसऱ्या रांगेत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तपासणी करण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या .ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांची डॉ.तोसिफ खान वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी केली जाऊन शिक्का देण्यात आला आहे.यानंतर सायबर कॅफेमध्ये ऑनलाईन फार्म भरल्यानंतर जिल्ह्या बाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार आहे.यासाठी दिनांक ४ मे २०२० रोजी सकाळ पासून रुग्णालयात नागरिकांनी कुठलाही सोशल डिस्टनसींग न ठेवता गर्दी केली यामुळे सोशल डिस्टनचे चांगलेच तीन तेरा वाजले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *