भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना सर्वत्र थैमान घालत आहे अश्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात व भुसावळ शहरांमध्ये सुद्धा करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून भुसावळ तालुक्यात पोलिस प्रशासन अत्यंत चोख भूमिका बजावत असून आपली (ड्यूटी) कर्तव्य व जबाबदारी सांभाळत आहे. याकरीता शहरातील या कोरोना योद्धयांचे प्रोत्साहन वाढवून शुभेच्छा देण्याकरीता व त्यांचा उत्साह वाढवण्याकरता त्यांच्या कामाची दाद देण्यासाठी भारतीय सैन्य दलातील (आर्मी ), चव्हाण आज ३ मे रोजी भुसावळ येथे दाखल झाले होते.
यावेळी बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यां डॉक्टर्स व कर्मचारी या योद्ध्यांना आर्मीच्या वतीने केक कापून प्रोत्साहित करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आर्मीचे एस राजावालवे, एस के पांडे,
दिनेश, राजवीर सिंग, नरपत सिंह, संदीप तसेच उपविभागीय पोलिस अधीक्षक गजानन राठोड , पो निरीक्षक दिलीप भागवत , यांचेसह पोलिस कर्मचारी तसेच पालिका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
देशाच्या सीमेवर आपले रक्षण करणाऱ्या योद्ध्यांनी कोरोना युद्धात रक्षण करणाऱ्यां योद्ध्यांचा केलेला गौरव ही अतिशय गौरवाची बाब असून या दोघां रक्षकांना सर्वांच्या वतीने ग्रैंड सैल्यूट यावेळी देण्यात आला .
आपण सर्वजण त्यांच्यासोबत राहू व शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन १०० टक्के करू तसेच कोरोनाच्या युद्धात विजयी होऊया असा दृढ निश्चय उपस्थितांनी व्यक्त केला .



