भुसावळ (प्रतिनिधी ) –
शहरातील पंचशील नगर भागात लोकडाउनच्या काळात चोरुन हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यां दोघां पैकी एकास बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात घेतले तर एक फरार झाला आहे .
शहरातील पंचशील नगर जवळच्या नाल्याचे बाजुला सार्वजनिक जागी दोन इसम हे चोरटी दारू विकत असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळल्यावरून यांच्या आदेशानुसार तात्काळ गुन्हेशोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी दिनांक २९ एप्रिल बुधवार रोजी १.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयीत आरोपी शेख वसीम शेख चांद रा.पंचशील नगर भुसावळ हा मिळुन आला व त्याचे सोबतचा दुसरा आरोपी नाल्याच्या बाजुच्या वस्तीचा फायदा घेवुन पळून गेला त्याचे नाव आरोपी शेख वसीमला विचारले आसता त्याने त्याचे नाव -नितीन उर्फ टक्कल मधुकर कांडेलकर रा.कृष्णा नगर भुसावळ असे सांगितले. हे दोघे १० लिटर गावठी हातभट्टी ६०० रुपये किंमतीची दारूची चोरटी विक्री करीत असतांना मिळून आल्याने दोघां संशयीत आरोपीं विरुद्ध मुंबई प्रोव्हीशन अॅक्ट कलम- 65(ई) प्रमाणे कार्यवाही केली आहे.
ही कार्यवाही .उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत , यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे,पो कॉ विकास सातदिवे,श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी यांनी केली आहे.



