भुसावळात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण करु नये ; स्वयंघोषित जनता कर्फ्यू मान्य नाही ; जिल्हाधिकारी यांच्याच आदेशांचे पालन करणार – माजी आ. संतोष चौधरीं

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळात १ मे पासून तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा भाजपच्या काही पदाधिकारी यांनी दिलेला स्वयंघोषित निर्णय हा बोगस असून जनतेने आधी सुरू असलेल्या लॉकडाऊनच्याच नियमांचे पालन करावे, असे आवाहन माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज दिनांक ३० गुरुवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी विरोधकांनी शहरात त्यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टिका करून भाजप पादाधिकारी भुसावळकर नागरिकांची दिशाभूल करीत आहे .
लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहेच त्यात ज्या परिसरात कोरोना बाधित आढळले ते भाग सील केले आहे ,त्यामुळे तीन दिवसांकरीता पुन्हा कर्फ्यू पाळण्याचे कोणतेही ठोस कारण नाही असे तरीही या प्रकरणी भाजपने विरोधकांना विश्‍वासात न घेता नियमबाह्य तीन दिवसीय बंद पाळण्याचे आवाहन केले हे अमान्य असल्याचे माजी आ. संतोष चौधरीं यांनी सांगितले .तसेच यावेळी चौधरीं म्हणाले की , राजकारण करायची ही वेळ नाही, राजकारण खेळायचेच असेल तर जुलै महीण्यानंतर खेळा असे म्हणत टोला लगावला . शहरात काही भाग सील करण्यात आले आहेत तरीही यां भागातील काही किराणा माल हा दुसऱ्या दुकानात नेवून ठेवन्यात आला आहे . याआधीचे ३६ दिवस हे लोक झोपले होते क़ाय असा प्रश्न उपस्थित केला .
पालिकेने अमुक एका दुकानातूनच किराणा घ्यावा असे
जबरदस्तीने लादले आहे हे योग्य नाही जनता त्यांना हव्या त्या दुकानांतुन किराणा वा जीवनावश्यक वस्तु घ्याव्या, असेही ते म्हणाले .
लॉक डाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही , लोकांनी स्वत:हून लॉक डाऊन पाळावा, प्रशासनाचे नियम सुद्धा काटेकोर पाळावे ,
साई बाबा ट्रस्ट तर्फे गरीब जनतेला कर्तव्य जबाबदारीच्या भावनेतुन मदत करत होतो आजपावेतो जवळपास ७ हजार २४९ लोकांना मदत केली , मात्र यां सत्ताधार्‍यांच्या पोटात दुखले हिंमत असेल तर त्यांनी देखील मदत करावीअसे आव्हान देत अजूनही सुमारे ५५० कुटुंबाना मदत द्यायची राहिली असल्याचे त्यांनी सांगितले जनतेने घाबरु नये,शासनाची परवानगी काढून मदत नक्कीच करु अन्यथा या लोकांच्या बैंक खात्यात 500 रुपये टाकन्यात येणार असल्याचेही माजी आमदार संतोष चौधरीं म्हणाले शहरातील जनतेचे तीन दिवस हाल होऊ देणार नसल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.
१ते३ में दरम्यान शासनाचे तांदूळ वाटप होणार आहे त्यामुळे या जनता कर्फ्यु मुळेरेशनदुकानातील धान्याचा काळाबाजार होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची शंका व्यक्त केली . तसेच जे पदाधिकारी जबरदस्ती जनतेला त्रास देतील वा वेठीस धरतील त्यांचे विरुद्ध शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी शासनास केली आहे .रमजान सुरु झाला असून मुस्लिम बांधवाना काही वस्तु घेण्यासाठी बाहेर जावेच लागते त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे कडून आदेश येत नाही तोपर्यंत या खोट्या फसव्या बंदला आम्ही
मानणार नाही असेही स्पष्ट केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *