भुसावळात भाजपाने स्वयंस्फूर्तीने पुकारलेला लॉकडाऊन सर्वपक्षीय नाही – माजी आ. संतोष चौधरीं ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहर १ ते ३ मे दरम्यान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत भाजपाने घेतलेली भूमिका ही सर्वपक्षीय नाही यामुळे या काळात किराणा माल विक्रीसह दुध डेअरी तसेच भाजीपाला विक्री सुरूच राहणार असल्याची भूमिका माजी आमदार संतोष चौधरी यांनी मांडली आहे. ते म्हणाले की, हा निर्णय भाजपाने घेतलेला असून प्रांताधिकारी व जिल्हाधिकार्‍यांचे याबाबत कुठलेही आदेश नाहीत. तसेच
भुसावळकरांना शासनाचे आदेश मान्य असल्याचेही संतोष चौधरी म्हणाले .
शहरातील ज्या भागात कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत त्या भागात १४ दिवस लॉकडाऊन करण्यात आले त्या नुसार शासनाने दिलेले प्रत्येक आदेश आम्हाला मान्य आहेत. मात्र भाजपा पदाधिकार्‍यांना यांचे शहर बंद करण्याचा अधिकार नाही.
भुसावळकरांची गैरसोय होवू नये म्हणून दुध डेअरी, किराणा माल दुकाने व भाजीपाला विक्री सुरू ठेवावी, असे आवाहनही माजी आमदार चौधरींनी केले आहे. ज्यांना स्वयंस्फूर्तीने बंद पाळावयाचा आहे त्यांनी बंद पाळावा, त्याला आमचा विरोध नसल्याचेही माजी आ.संतोष चौधरी यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *