भुसावळ (प्रतिनिधी )
तालुक्यातील कु-हे पानाच्या गावातील शरद अमृत पाटील याला नेहमी प्रमाणे उधार पैसे मागितले असता देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने मित्राने धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना दुपारी घडली. अक्षय तृतीयाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्यामुळे जुगाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
बाबत माहिती अशी की,फिर्यादी राहुल महादेव गांधेले वय 24 राहणार विठ्ठल मंदिर मागे कु-हे पानाचे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शरद अमृत पाटील राहणार कु-हे पानाचे हे शेतीकाम करतात.तसेच करन उर्फे अमोल अमृत बावस्कर हे दोघे मित्र आहे.हे सोबत शेतात गेले होते.याआधीही दोन वेळा शरद पाटील यांनी अमोलला पैसे उधार दिले होते.दिनांक 24 एप्रिलला अमोलने पुन्हा शरद पाटील याला नेहमी प्रमाणे 1000 रुपये उधार मागितले.शरद पाटील यांनी देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने आरोपी करन उर्फे अमोल बावस्कर हा मोटरसायकलवर चेतानाथ मंदिर हॉल जवळ आला व ओट्यावर बसलेल्या शरद पाटील याला काहीही न बोलता दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 4.00 वाजेला लोखंडी धारदार वस्तूने हल्ला केला.व तो मोटरसायकलने पळून गेला. शरद पाटलांना तोंडावर मारल्याने त्यांचा ओठ फाटला व त्यांचा रक्तश्राव सुरू झाल्याने ते जखमी झाले.त्यानां तातडीने भुसावळ येथील रिदम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले.घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली.तालुका पोलीस स्टेशनला कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी फरार झाला असून जखमींवर रिदम हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.गुन्ह्याचा तपास पो नि रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहे.



