हातभट्टी दारूची चोरटी वाहतूक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुका पोलिसांनी शनिवार २५ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करीत असताना १२.१५ वाजेचे सुमारास भुसावळ कोर्टाच्या मागे धम्म नगर भागात मोटर सायकलवरुन कॅन मधून चोरुन अवैध दारू विक्रिस नेणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडून त्यांचे विरुद्ध कारवाई केली आहे .
शनिवार २५ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करीत असताना १२.१५ वाजेचे सुमारास भुसावळ कोर्टाच्या मागे धम्म नगर भागात चोरुन अवैध दारू विक्रिस नेणारे संशयीत आरोपी दिनेश नाना नरवाडे , व शंकर भगवान महाजन दोघे राहणार भुसावळ हे भुसावळ कोर्टाच्या मागे धम्म नगर भागात मोटर सायकलने साकेगाव बायपास नजिकच्या रोडने जात असताना ३५ लिटर कॅन मध्ये २५ लिटर गावठीहात भट्टीची तयार दारू व मोटारसायकल सह अंदाजे २८ हजार १५० रुपये किंमतीच्या मुद्देमालसह चोरटी वाहतूक करतांना मिळून आले. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केली म्हणून भादवी कलम 270, 271, 188, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाआहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,सपोनि अमोल पवार, सहायक्क फौजदार सुनील चौधरी भीमदास हिरे ,पो हे कॉ विठ्ठल फुसे, विजय पोहेकर ,प्रदीप इंगळे, जगदीश भोई , होमगार्ड शेकोकारे, यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *