दीपनगर वसाहतीमधील घरकाम करणाऱ्यां मोलकरींना वेतन मिळावे

भुसावळ (प्रतिनिधी )-
वसाहतीत कामगार व अधिकारी यांच्याकडे घरगुती कामासाठी असलेल्या घरकाम करणाऱ्यां (मोलकरिण) महिलांना त्वरीत वेतन देण्यात यावे अशी मागणी भुसावळ दीपनगरचे औ.वि.केंद्रचे
मुख्य अभियंता यांना राष्ट्रवादी ट्रेड यूनियन कॉंग्रेस तर्फे जनरल सेक्रेटरी अरुण दामोदरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे . वरील विषयानुसार निवेदनात नमूद आहे की , औ. वि. केंद्र, दीपनगर वसाहतीत अनेक वर्षापासुन अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे अनेक महिला घरगुती कामाकरीता कार्यरत होत्या . परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासुन लॉकडाऊन झाल्यामुळे अचानक या घरकाम करणाऱ्यां महिलांना अनेकांनी घरी बसवलेले आहे. त्यामुळे त्या महिलांना कुटूब सांभाळतांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या महिलांचे महाराष्ट्र शासनाने घोषीत केल्याप्रमाणे वेतन देणे गरजेचे आहे. त्यानुसार संबंधित यांनी या बाबत गंभीर विचार करून त्वरीत निर्णय घेवून या महिलांना पगार (वेतन) द्यावे असेही आवाहन संघटनेने केले आहे . याबाबत तहसिलदार व सहाय्यक कामगार अधिकारी जळगाव यांना देखील निवेदन प्रत पाठविली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *