एस.टी.कर्मचाऱ्यांचा कोरोना ग्रस्तांसाठी मदतीचा हात.

भुसावळ (प्रतिनिधी )-
एस.टी.महामंडळ भुसावळ आगारातील कर्मचाऱ्यांनी कोरोना ग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला असून भुसावळ आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी डेपोतील श्री.गुरुदत्त मंदिर सेवा समिती तर्फे कोरोना बाधितांना सहाय्य करण्यासाठी तहसीलदार दिपक धिवरे यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ हजार १११ रकमेचा धनादेश सुपूर्द केला. जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे.भारत सरकारने त्यावर वेळीच उपाययोजना केल्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपण भारतीय कोरोनाशी समर्थपणे लढा देत आहोत. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व एस.टी. कर्मचारी बांधील आहोत. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी न करता घरीच थांबावे .काही दिवसातच कोरोनाशी असलेली लढाई आपण नक्कीच जिंकू असा आत्मविश्वास व्‍यक्‍त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *