भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेतर्फे कल्याण व चांगसारी दरम्यान वैद्यकीय, भोजन आदी अत्यावश्यक वस्तू पाठविण्यासाठी दि.१७ एप्रिल रोजी पार्सल रेल्वे चालवणार आहे . जर संपूर्ण पार्सल गाडी एखाद्या पार्टीद्वारे सुरूवातीच्या ठिकाणी लोड केली तर पार्सल गाडी गंतव्य स्थानकावर पोहचण्यासाठी मधल्या स्थानकांवर न थांबता हि गाडी चालविली जाऊ शकते. कोणत्याही गंतव्य स्थानकासाठी पार्टीद्वारे पूर्ण पार्सल गाडीची मागणी केल्यास, सेवा प्रदान करण्यासाठी मध्य रेल्वे तत्परतेने कार्य करेल. या गाड्यांमध्ये कोणत्याही प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही.
००११७ पार्सल गाडी कल्याण येथून दि.१७ एप्रिल रोजी ८-३० वाजता सुटेल व इगतपुरी,भुसावळ,नागपूर,दुर्ग,बिलासपूर,झारसुगुडा,टाटानगर,डानकुनि,मालदा टाऊन,न्यू बोंगाईगांव येथून २० रोजी ३ वाजता चांगसारीला पोहोचेल.
००११८ पार्सल गाडी दि.२० रोजी ११-३० वाजता चांगसारी येथून सुटेल व न्यू बोंगाईगांव,मालदा टाउन, डानकुनि, टाटानगर, झारसुगुडा, बिलासपूर, दुर्ग,नागपूर, भुसावळ,इगतपुरी व तेथून दि.२३ एप्रिल रोजी ७-३० वाजता कल्याण येथे पोहोचणार आहे .
या गाडीत चांगसारी साठी २ पार्सल व्हॅन,डानकुनिसाठी १,कल्याण येथून १ लगेज कम गार्ड व्हॅन,भुसावळ येथून ३ पार्सल व्हॅन,नागपुर येथून २ असे एकूण ९ डबे असतील अशी माहिती भुसावळ रेल्वे विभागाने दिली आहे.



