मुंबई –
या कोविड च्या काळामध्ये कर्मचार्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने ‘रेल परिवार देख-रेख मोहीम’ सुरू केल्यापासून मध्य रेल्वेने रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह 2 लाखांची संख्या पार केली असून रेल्वे बोर्डाने या कल्पनेचे कौतुक केले आहे आणि इतर सर्व रेल्वे झोन्स यांनी सुद्धा त्याचा अवलंब केला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी दिली असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने विभागाने प्रसिद्धि पत्रकान्वये १२ एप्रिल रोजी दिली आहे .
यामागील मुख्य कल्पना म्हणजे मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे कर्मचार्यांशी नियमित संपर्क साधणे, त्यांच्या आरोग्याच्या स्थितीची नोंद ठेवणे (कुटुंबातील सदस्यांसह), लॉकडाउन कालावधीत पुरेसे सहकार्य प्रदान करणे आहे .
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल म्हणाले की, कोविड-१९ (साथीचा रोग) विरूद्ध सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेल्या आणि रेल्वे कर्मचार्यांमधील एकता वाढविण्याच्या सुरू असलेल्या लढाईत या मोहिमेला उच्च स्तरावरील सहकार्यासाठी तयार केले जाईल. हा उपक्रम राबवण्यासाठी इतर सर्व विभागांशी समन्वय साधलेल्या मानव संसाधन विभागाची भूमिका उल्लेखनीय असल्याचेही मित्तल म्हणाले .
याबाबत मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी डॉ. ए.के. सिन्हा म्हणाले की, सर्व रेल्वे कर्मचारी आणि अधिका-यांना एक संपर्क दिनदर्शिका सांभाळण्यासाठी निरोप पाठविण्यात आला आहे. ज्यामध्ये ते ज्या लोकांनी आपल्याशी संपर्क साधला त्यांची नावे व तपशील लिहून ठेवावेत. जर यापैकी कोणी कोविड-१९ पॉझिटिव्ह झाला तर संपर्कांचा मागोवा घेण्यासाठी मदत होऊ शकेल. ते म्हणाले की, मध्य रेल्वेच्या सर्व विभागांतील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या संसाधनामुळे 2 लाखांची संख्या गाठणे शक्य झाले आहे.
फायदे :-
प्रत्येक कर्मचार्यांशी संपर्क साधला गेला आहे आणि स्थानानुसार मॅपिंग केले गेले आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचण्यास मदत होऊ शकेल. या वैयक्तिक संपर्क कार्यक्रमातून ‘आरोग्य सेतु अॅप’ जवळपास सर्व कर्मचार्यांनी तसेच अतिरिक्त ५०,००० निवृत्तीवेतनाधारकांनीही आजवर डाउनलोड केला आहे. कर्मचार्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यात येत आहे, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन त्यांच्या सोबत आहे असे वारंवार सांगितले जात आहे. कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या सर्व उपायांची माहिती सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी उपलब्ध केली जात आहे.वसाहत काळजीवाहू (कॉलनी केअर) समित्या कार्यान्वित केल्या गेल्या आहेत आणि कर्मचार्यांच्या व युनियन सदस्यांच्या मदतीने इतर स्थानिक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि त्या लॉकडाऊन दरम्यान कर्मचार्यांच्या दैनंदिन गरजा भागविल्या जात आहेत. आतापर्यंत मुख्यालय – एकूण कर्मचारी १७,२९५ – डाउनलोड केलेले १६,४८५ + १६,५७२ कुटुंबातील सदस्य , मुंबई विभाग – एकूण कर्मचारी ३१,९०७ – डाउनलोड केलेले ३०,०१९+ ४४,०६१ कुटुंबातील सदस्य
नागपूर विभाग –
एकूण कर्मचारी १५,७५० – डाउनलोड केलेले १४,०५२ + १४,१५४ कुटुंबातील सदस्य
भुसावळ विभाग – एकूण कर्मचारी १६,०२६ – डाउनलोड केलेले १३,८४६ + १०,४०१ कुटुंबातील सदस्य
पुणे विभाग – एकूण कर्मचारी ९,२१० – डाऊनलोड केलेले ८,९१४+ ११,२४१ कुटुंबातील सदस्य
सोलापूर विभाग – एकूण कर्मचारी १०,१४८ – डाउनलोड केलेले ९,३८८ + १२,३०९ कुटुंबातील सदस्य, एकूण = कर्मचारी १,००,३३६ – डाउनलोड ९२,७०४ + १,०८,७३८ कुटुंबातील सदस्य.
या मोहिमेत रेल्वे कंत्राटी कर्मचारी आणि संबंधित कामगारांचीही दखल घेण्यात येत आहे.



