साकेगाव जवळ वाघूर नदीच्या पुलाच्या कार्यास प्रारंभ पावसाळ्याआधी पूल वाहतुकीसाठी खुला होणार जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहराजवळ सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणकार्याच्या कामाला अत्यंत वेगाने सुरुवात झाली होती मात्र लाँकडाउनलोड नंतर कामाला ब्रेक लागले होते तब्बल २२ दिवसानंतर जिल्हाधिकारी च्या परवानगीनंतर साकेगाव जवळील वाघुर नदीच्या नविन पुलाच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
मृत्यूचा सापळा म्हणून ओळख झालेल्या महामार्ग चौपदरीकरणाची लाँकडाऊन पूर्वी अत्यंत वेगवान गतीने काम सुरू होते २२ मार्चला जनता कर्फ्यू नंतर कामही बंद पडले पावसाळ्यापूर्वी ८०% टक्के पूर्ण झालेले साकेगाव जवळील वाघुर नदी चे कार्य लाँकडाऊन’मुळे थांबले होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता परंतु जनता कर्फ्यू नंतर लाँकडाऊन’मुळे पुलाचे कार्यही बंद पडले होते पुला चे कार्य पावसाळ्यापूर्वी व्हावे याकरिता ‘नही’ ने जिल्हाधिकाऱ्यांना कामाची परवानगी मिळावी याकरता पत्रव्यवहार केले होते, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुलाचे कामाकरिता परवानगी दिली असल्याचे पूल कार्याचे प्रोजेक्ट हेड अनिल कुमार यांनी सांगितले.
वैद्यकीय तपासणीनंतर ३० कर्मचाऱ्यांना परवानगी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काम बंद असताना पुलाचे अत्यंत महत्त्वाच्या कामाला परवानगी देण्यात आली मात्र यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये याकरिता फक्त ३० कर्मचाऱ्यांना पुलाच्या कार्यासाठी परवानगी देण्यात आली असून ५ मजुरांचे सहा तुकड्या तयार करण्यात आले असून प्रत्येक कर्मचाऱ्याची एका तासानंतर सॅनिटाइजर करण्याची व्यवस्था करण्यात आली असून तसेच दर दोन तासानंतर प्रत्येकाचे शारीर शरीराचे तापमान ही तपासण्यात येते.
डॉक्टर्स १५ वैद्यकीय कर्मचारी नियुक्ती
कार्य सुरू असताना कोणताही प्रकारचा रिस्क नको याकरिता दोन डॉक्टर सह १५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही अनिल कुमार यांनी सांगितले
सोशल डिस्टन्सीगने होणार कार्य
पुलाचे कार्य जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही मजुरांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे यासाठी कामावर जाण्याआधी प्रत्येक कर्मचाऱ्याचे शरीराचे तापमान तपासणी करण्यात येत असून सोशल डिस्टनसिंग नुसारच कार्य होईल अशा पद्धतीने कार्याचे नियोजन करण्यात आले आहे
असा राहणार नवीन पूल
महामार्गावर वाघुर नदी वर जुन्या पुलाच्या बाजूला नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत असून पुलाचे संपूर्ण कार्य झाल्यानंतर जुने पूल तोडण्यात येणार आहे. नवीन पुलाची एकूण लांबी १९३ मीटरची असून यामध्ये २७.८मीटर चे ७ गाळे आहेत तसेच पुलाची सोैडाई १२ मीटरची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *