भुसावळ (प्रतिनिधी ) –
जंक्शन च्या ठिकाणी शहराच्या मध्यभागापासून कानाकोपर्यापर्यंत तब्बल बाराशे रिक्षा चालतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनमुळे रिक्षाची चाकं थांबली अाहे,दररोज तब्बल सहा लाखाची उलाढाल ठप्प झाल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्हा निर्मितीकडे वाटचाल सुरू असलेल्या महत्त्वाच्या जंक्शन ठिकाणी ३० पेक्षा जास्त रिक्षा स्टॉप च्या माध्यमातून दररोज बाराशे पेक्षा जास्त रिक्षाचालक संपूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यात पर्यंत शहरवासीयांना सेवा देऊन उदरनिर्वाह भागवतात परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची संचारबंदी लागू झाल्याने रिक्षाचालकांवर पर्यायी काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.,
शहरात रेल्वे स्टेशन च्या दोन्ही बाजूच्या स्टॉप तसेच बसस्थानक समोरील स्टॉप हे मुख्य थांबे आहेत या ठिकाणाहून प्रवाशांना साधारण शहराच्या आठ ते दहा किलोमीटर पर्यंत प्रवाशांना सेवा देण्यासाठी प्रतिसिट १५ ते २० रुपये प्रमाणे भाडे आकारले जाते, दिवसभरातून एक रिक्षा चालक जवळपास ५०० रुपयांपर्यंतची कमी-जास्त कमाई करून आपल्या संसाराचा गाडा ओढत असतो याच पैशातून रिक्षाचा मेंटेनन्स सुद्धा करत असतो.
परंतु कधी नव्हे अशी संकटकालीन स्थिती रिक्षाचालकांवर आली असून पर्यायी काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ रिक्षा चालकांमध्ये आलेली आहे.
दीड कोटींची उलाढाल ठप्प
शहरांमध्ये रिक्षाचालकांच्या माध्यमातून दररोज सहा लाखापर्यंतची उलाढाल होत असे याप्रमाणे लॉक डाऊन झाल्यापासून आजरोजी तब्बल दीड कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे.
शाळेवरील रिक्षांचे शेवटच्या महिन्याची पगार मिळालीच नाही
शहरांमध्ये विविध शैक्षणिक संस्थेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी बहुतांश रिक्षा विद्यार्थ्यांना शाळेत ने- आण करण्यासाठी महिन्याचे हिशोबाने पैसे देत होते, मार्च महिन्यांमध्ये अचानक १६ तारखेपासून शाळांना सुट्या घोषित केल्यामुळे अनेक पालकांनी रिक्षाचालकांना पगारच दिली नाही, अनेक रिक्षा हे बँकेचे कर्ज घेऊन चालतात मात्र लाँकडांऊनच्या परिणामामुळे रिक्षाचालकांना फायनान्स हप्ते भरण्यात तर दूर संसाराचा गाळा ओढण्यासाठीही पैसे नाही.
शासनाने अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षाचालकांना संधी द्यावी
लाँकडाऊनमुळे शासनाने अनेक ठिकाणी शहरांमध्ये छोट्या-मोठ्या वाहतुकीची गरज भासते अशा वेळेस जर अत्यावश्यक सेवेसाठी शासनाच्या काम कामानिमित्त रिक्षाचालकांना प्राधान्य दिले असते तर रिक्षाचालकांचा काही अंशी प्रश्न सुटू शकला असता.
शहरात मुख्य रिक्षा स्टॉप
रेल्वे स्थानक दक्षिणेकडील, उत्तर भागाकडील रिक्षा स्टॉप ,बस स्टॅन्ड समोरील स्टॉप ,गांधी चौक, अमर स्टोअर जवळ, आठवडे बाजार, शिवाजीनगर, पांडुरंग टॉकीज रिक्षा स्टॉप, अष्टभुजा रिक्षा स्टॉप, आरपीडी रोड रिक्षा स्टॉप, गणेश कॉलनी रिक्षा स्टॉप, रजाटाँवर रिक्षा स्टॉप, वसंत टॉकीज रिक्षा स्टॉप, आनंद नगर रिक्षा स्टॉप, बालाजी मंदिर रिक्षा स्टॉप ,नाहाटा चौक रिक्षा स्टॉप, जळगाव नाका रिक्षा स्टॉप, मामाची टाँकीज रिक्षा स्टाँप.
शासनाने रिक्षा चालकांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व त्यांना पर्यायी कामाची व्यवस्था करून द्यावी किंबहुना शासनाच्या अत्यावशक सेवेसाठी रिक्षाचालकांना तरी संधी द्यायला हवी असे दिलीप कोळी अध्यक्ष ,सेन्ट अलाँयसेस स्कूल चालक-मालक परिवहन समिती, भुसावळ यांनी सांगितले .



