आयुध निर्माणी जवळील मिलिंदनगरवासीयांवर उपासमारीची वेळ

वरणगाव (प्रतिनिधी )-
वरणगाव आयुध निर्माणी जवळ असलेल्या मिलिंद नगर वसाहतीमध्ये गेल्या अठरा दिवसापासून लॉक डाउन लागल्यामुळे हाताला काहीच काम नसल्याने उपासमारीची वेळ येत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की मिलिंद नगर हे पूर्ण मजुरांची वस्ती असून या ठिकाणच्या महिला वरणगाव फॅक्टरी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे धुणी-भांडीची कामे करतात तसेच पुरुष मजुरीचे काम करतात लॉक डाऊन झाल्यापासून संपूर्ण रोजगार नष्ट झाल्याने महिला व पुरुष घरातच असल्याने यांच्याकडे खाण्यापिण्याचे किराणा साहित्य नसल्यामुळे त्यांच्यावर सध्या अतिशय हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे , शासनाकडून केवळ रेशन वर मिळणारे धान्य या व्यतिरिक्त काहीही यांच्याकडे मिळाले नसल्याने आज रोजी वृद्ध लहान बालक महिला पुरुष यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ येत आहे याबाबत माहिती घेतली असता एका घरात तर मुलं केवळ मिठाबरोबर पोळी खात असल्याचे समोर आले, दररोजची रोजंदारी नष्ट झाल्याने ही आपत्ती त्यांच्यावरती ओढवली आहे शासन स्तरावर कोणतीही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही झोपडीवजा घरात राहत असताना त्यांना इतर सुविधा तर नाही खाण्यापिण्याच्या सुद्धा त्यांचे हाल होता आहे तहसीलदार, जिल्हाधिकारी आदींनी याबाबत त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी मिलींदनगरवासीयांनी केली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य बोधिसत्व अहिरे व कुसुम गायकवाड यांनी पाहणी केली.
शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून किराणामाल धन्य धिमाल याचे वाटप करण्यात आले तर काही ठिकाणी भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनधान्य घरांमध्येही धान्य वाटप करण्यात आले परंतु खऱ्या अर्थाने गरजवंतांना पर्यंत पोहोचण्याची गरज आहे शासनस्तरावरून मदत होईल तोपर्यंत या परिसरात अन्नधान्याची गरज निर्माण झालेली आहे तरी स्वयंसेवी संस्थांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
उपासमारीमुळे प्रश्न बिकट होईल
कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव सर्वीकडे होत आहे परंतु आयुध निर्माणी जवळील मिलिंद नगर मध्ये मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांकडे खाण्यापिण्याचे साहित्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अथवा स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी
कुसुम गायकवाड ग्रामपंचायत सदस्य दर्यापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *