नवी मुंबई –
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजपा महामंत्री डॉ राजेश पाटील, परीवहन सदस्य काशिनाथ पाटील यांनी स्वखर्चातून फवारणी करीत जनतेशी असलेली बांधिलकी जपली आहे
9 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्यात आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार गणेश नाईक यांच्या सहकार्याने नवी मुंबई भाजपा महामंत्री डॉ राजेश पाटील, माजी नगरसेवक तथा परिवहन सदस्य काशिनाथ पाटील यांनी स्वखर्चातून जुईनगर परिसरातील सेक्टर 21, 22, 23, 25 च्या भागात सोडियम हायपोक्लोराईट केमिकलची फवारणी करण्यात आली आहे. जुईनगर परिसरातील जनतेनं आपल्या सोसायटी वा रो हाऊस मध्ये फवारणी करण्यासाठीचे आवाहन पत्रक वाटप करण्यात आलेलं आहे.त्यामुळे जनता पत्रक वाचून सपंर्क साधता आहे.त्यामुळे स्वखर्चातून फवारणी करण्यात येत आहे “जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” असल्याचे मत काशिनाथ पाटील यांनी व्यक्त केले तर सोसायटी मधील नागरिकांनी ताबडतोब सपंर्क साधावा जेणेकरून फवारणी मध्ये कोरोनाला आळा घालण्यास निश्चित मदत होणार असल्याचे डॉ राजेश पाटील यांनी सांगितले.



