रोटरी क्लब व जय गणेश फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील जय गणेश फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्‍या संयुक्‍त विद्‍यमाने दि.१५-एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तपेढ्यांमध्ये रक्त बॅगचा तुटवडा होऊ नये यासाठी भुसावळ शहरातील जय गणेश फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या संयुक्त विद्यमाने संतोषी माता हॉल मध्‍ये दि.१५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान हे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. यावेळी ऐसपैस जागेमुळे सोशल डिस्टनसींग व १४४ कलमाचे पालन होणार आहे. तसेच रक्तदात्यांना संचारबंदी काळात येण्या-जाण्यासाठी पासेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तरी शहरातील बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक कार्यास हातभार लावावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, सचिव राजेंद्र यावलकर,जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक अरुण मांडळकर, गणेश फेगडे आणि प्रकल्प प्रमुख सरफराज तडवी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *