जळगाव रोड परिसरातील ‘ त्या ‘ २१८ परिवारांना धान्य मिळण्यास सुरुवात ; प्रा.धिरज पाटील यांच्या पाठपूरवठयाला यश ; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र्यांकडे केली होती तक्रार;

भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव रोड परिसरातील श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी, परिसरातील २१८ शिधापत्रिकाधारकांचा दुकान नंबर १२च्या दुकानदाराने आवश्यक धान्य साठा नसल्याने पुरवठा बंद केला होता. गोरगरिबांना संचारबंदीत काम नसल्याने खिशा रिकामा आहे त्यात धान्य मिळणार नाही म्हणून शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी दिनांक ५ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे केली होती. तसेच प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धिवरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्याकडे समस्या मांडल्या होत्या व चर्चा झाली होती.
तहसीलदार दीपक धिवरे, पुरवठा अधिकारी तायडे, दुकानदार व प्रा.धिरज पाटील यांच्या सोबत बैठकित समस्यांवर चर्चा झाली व तहसीलदारांनी योग्य उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. आज दिनांक ११ एप्रिल रोजी ६५ ग्राहकांना धान्य वितरित करण्यात आले. संचारबंदीच्या काळात हाताला काम नसणाऱ्या सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून उद्या पासून उर्वरित ग्राहकांना धान्य वितरण होईल यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असून सदर दुकानदाराला सूचना दिल्या आहेत असे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.
काही ग्राहकांनी मिळालेल्या धान्याच्या दर्जेबाबत प्रश्न उपस्थित केले. दुकानदाराला असे धान्य न देण्याच्या सूचना केल्या. सर्वच ग्राहकांना दर्जेदार धान्य मिळालेच पाहिजे यासाठी शासन स्तरावर बोलणी करून नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जाईल अशी माहिती प्रा.पाटील यांनी दिली.
पंकज इंगळे यांनी संचारबंदीचे उल्लंघन न होता प्रत्येक ग्राहकाला धान्य मिळेल असे नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *