मुंबई –
कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे आवश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी फक्त मालवाहतूक चालवित आहे. २४ x ७ सतत कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांतील मालवाहतूक धक्के (गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचा-यांनी देशभरात पुरवठ्यासाठी ७४४ रॅक्समध्ये आवश्यक वस्तूंच्या ३७,७७८५ वॅगन लोड करणे शक्य केले आहे.यामध्ये
कमोडिटी वॅगन्स
कोळसा – २२,४३४
कंटेनर – ११,०९९
पेट्रोलियम उत्पादने – २,४६५
विविध वस्तू – ८१५
खते -. ३९२
स्टील – १६९
साखर – १६८
डी-ऑईल केक – १२६
सिमेंट – ११७
एकूण = ३७,७८५
मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे अशा विविध ठिकाणी २३ मार्च ते ७ एप्रिल २०२० पर्यंत या वॅगन्स लोड केल्या गेल्या.
अत्यंत वरिष्ठ स्तरावर अधिका-यांमार्फत मालवाहतूकीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्य रेल्वेला या कठीण काळात आपली महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव आहे आणि या प्रयत्नात पूर्णपणे सहकार्य करण्याची सर्व भागधारकांना विनंती केली आहे.



