भुसावळ (प्रतिनिधी )
शहरातील गौतम नगर भागातील एका घरासमोरील सार्वजनिक जागी असलेल्या गटारीत कचरा फेकल्याच्या संशय आल्याचे कारणावरून तीघानी एका महिलेच्या डोक्यात काठीने वार करून शिविगाळ करीत मारहाण केल्या प्रकरणी येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला तिघा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,गौतम नगर भागातील सौ.रोशनी संतोष मोरे वय ३४ यांचे घरासमोरील गटारीत कचरा फेकल्याचा संशय आरोपी छायाबाई विक्रम वानखेडे,रितिका वानखेडे,विक्रम हरी वानखेडे यांना आल्याने त्यांनी संगमताने 3 एप्रिल रोजी 12.30 वाजेच्या सुमारास फिर्यादि रोशनी मोरे हिला शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्यांनी मारहान करून तिघा आरोपींनी डोक्यात काठीने मारून दुखापत केली.अशी फिर्याद सौ मोरे यांनी दिल्यावरुन
दिनांक 7 एप्रिल रोजी बाजारपेठ पोलिसा ठाण्यात गुरुन 189/2020 भाग-5 भादवी कलम 324,323,504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



