भुसावळच्या रेल्वे ब्रेक डाऊन विभागाने तयार केले हॅंड विरहित वॉश बेसिन ; कामगारांचे होत आहे सर्वत्र कौतुक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ येथील रेल्वे ब्रेक डाऊन विभागामधील कर्मचाऱ्यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर हात धुण्यासाठी पायांनी वापरता येणारी वॉश बेसिन तयार केली असून या कामगारांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
या कर्मचाऱ्यांनी जुण्या स्क्रॅप सामानामधून हे वॉश बेसिन तयार केले आहे.
. यासाठी जुन्या कोच मधील वापरात न येणारे वॉश बेसिंग, लोखंडी पाइप आदीं सामान वापरात घेऊन आणि त्यासोबत लिक्विड साबण असलेली एक नवीन टाकी याचा वापर करून पायाने चालवता येणारी वॉश बेसिन तयार केली आहे . साधारण रेल्वे कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन काम आटोपल्यानंतर हात धुण्यासाठी हे उपकरण तयार करण्यात आले आहे याचा मूळ उद्देश कोरोनाचा दुष्प्रभावाचे संक्रमण लक्षात घेता पाण्याचा नळ आणि लिक्विड साबनाला स्पर्श करूनच हात धुवावे लागत होते, पण या उपकरणाच्या साह्याने कोठेही स्पर्श न करता हात धुता येत असून हात स्वच्छ निर्जंतुक होत आहे
हे उपकरण मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता आणि वरिष्ठ पर्यावरण गृह व्यवस्था प्रबंधक पी रामचंद्रन यांच्या अनमोल मार्गदर्शनाने अत्यावश्यक सेवेत सदैव तत्पर असलेल्या ब्रेकडाऊन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार्थ सेन एसएसई यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आले आहे. हे उपकरण आरओएच, डेपो भुसावळ यार्ड, कोचिंग कॉम्प्लेक्स या विभागांमध्ये सुद्धा वितरीत करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *