भुसावळ ( प्रतिनिधी ) –
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी सुरू असल्याने अनेक कुटूंबाच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यासाठी प्रशासनाने शहरातील सेवाभावी ( एन.जी.ओ).संस्था मदत घेऊन नागरिकांना घरपोच जेवण,धान्य ,गृहपयोगी वस्तू पोहचविण्याचे काम सुरू केले आहे.
संचारबंदीच्या काळात (एन.जी.ओ) सामाजिक संस्थेची मदत घेऊन भुसावळ शहरातील गरजू कुटुंबानी आपल्या नावाची नोंदणी पालिके मध्ये केल्यानंतर त्यानुसार घरपोच गृहपयोगी वस्तू मिळणार आहे. यासाठी २५ सामाजिक स्तरावर कार्यरत (एन.जी.ओ).संस्था प्रशासनाच्या आदेशानुसार शहरात काम करीत आहे. प्रत्येक संस्थेला एक भाग ठरवून दिलेला आहे. त्याच भागामध्ये संस्थांचे काम सुरू आहे. गरजूंच्या नाव नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहे.सर्व शहरातील कामकाज नगरपरिषदेचे श्री कोचोरे पाहत आहे.



