मुक्ताईनगर –
राज्यभरात शिवसेनेच्या वचन नाम्यातील 10 रुपयात जेवण ही संकल्पना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवभोजन केंद्राच्या नावाने मंजूर होऊन जिल्हास्तरावर ही योजना यशस्वीपणे सुरू झाली . तसेच गत अर्थसंकल्पिय अधिवेशनात यासाठी भरीव निधीची तरतुद ही करण्यात आली . मात्र मध्ये कोरोना महामारी पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन झाल्याने दररोज च्या मजुरीवर ज्यांची चूल पेटते त्यांना ही योजना खूप मोठा आधार ठरत असून हेच सूत्र पाहून कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे साकडे घालत ही योजना मुक्ताईनगर येथे सुरू करावी यासाठी पाठपुरावा सुरू केला त्यानुसार हिरवी झेंडी मिळाल्याने जिल्हाधिकारी व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लागलीच याबाबत प्रस्ताव मागविला त्यानुसार येथे केवळ दोन दिवसांपूर्वी हे शिवभोजन केंद्र मंजूर झाल्याचे पत्र प्राप्त झाले होते . त्यामुळे मुक्ताईनगर येथे आज दि 5 एप्रिल रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्यातील तालुकास्तरावरील पहिल्याच शिवभोजन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला .
प्रसंगी पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे , गटविकास अधिकारी सुभाष मावळे , नगरपंचायत मुख्याधिकारी विक्रम जगदाळे , तालुका प्रमुख छोटू भोई , शहर प्रमुख गणेश टोंगे , आदी उपस्थित होते



