भुसावळ येथे गोदावरी नगर भागात ६० दिवे लावून पंतप्रधानांच्या आवाहनाला साद ; आगळया वेगळया पद्धतीने साजरा केला ६० वा वाढदिवस ;

भुसावळ (प्रतिनिधी) –
मध्य रेल्वेतुन नुकतेच 31मार्च 2020 रोजी सेवानिवृत्त झालेले भुसावळ येथील सर्व्हे नंबर 224/6 प्लॉट नंबर 2, गोदावरी नगर ,जळगाव रोड ,भागातील रहीवासी साहेबराव जयराम माळी यांचा 5 एप्रिल रोजी वाढदिवस होता .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा देवून माळी यांच्या कुटुंबाने कोरोना पार्श्वभूमीवर अहोरात्र काम करणाऱ्यां लोकांच्या संघर्षाला एक नवी रोशनी दाखवून आगळया वेगळया पद्धतीने
माळी यांचा वयाचा ६० वा वाढदिवस सबका साथ,तो करेंगे कोरोना पे मात असे म्हणत रविवारी रात्री 9 वाजेला 9 मिनिट घरात अंधार करून अंगणात ६० दिवे लावून देशाबद्दल आदर व्यक्त करुन वाढदिवस साजरा करून कार्यरत या सर्वाना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *