भुसावळ ( प्रतिनिधी)-
वराडसीम गटाच्या जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी सोमवार पासून विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन कोरणा संदर्भात करण्यात आलेले उपाय योजना व परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांनी घराबाहेर निघू नये असे आवाहन केले.
जि. प. सदस्या सावकारे यांनी सोमवार रोजी तालुक्यातील मांडवे दिगर, भिलवडी तांडा, मुसाळ तांडा, कुर्हे पानाचे व वांजोळा येथे भेटी दिल्या. मांडवे दिगर येथे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. येथील ग्रामस्थ सध्या शेतीच्या व्यवसायात व्यस्त असल्याचे सरपंच जाधव यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे येथे कोरोणाचा फारसा परिणाम होणार नसल्याची माहिती सरपंचांनी दिली. कुर्हे (पानाचे) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रामलाल बडगुजर, जिल्हा परिषद माजी सदस्य समाधान पवार, सुरेश गांधीले, सचिव राजू पाटील, संदीप बारी, विकास धांडे आदी उपस्थित होते. जि. प. सदस्य सावकारे यांनी गावात फवारणी झाली आहे का? यासंदर्भात विचारणा केली. तसेच बाहेरगावाहून येणार्या लोकांची तपासणी करण्यासंदर्भातही विचारपूस केली. त्याचप्रमाणे त्यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रला भेट दिली. व बाहेरगावाहून आलेल्या लोकांची नोंदणी करण्यात आली आहे किंवा नाही यासंदर्भात चौकशी करून माहिती घेतली.
वांजोळा ग्रामपंचायतीलाही दिली भेट- दरम्यान, जि. प. सदस्या सावकारे यांनी वांजळे ग्रा. पं. भेट दिली. व सरपंच देविदास सावळे यांचेकडून येथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी माजी सरपंच नरेंद्र पाटील, अँड. पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दरम्यान, येथे स्वस्त धान्य दुकानावर धन्य वाटप सुरू असताना त्याठिकाणीही त्यांनी भेट दिली. लाभार्थ्यांना अंतर सोडण्यात संदर्भात सूचना केल्या. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांना माक्स वाटप केले. पूर्ण मतदारसंघाचा दौरा करणार असल्याची माहिती दिली.



