वरणगाव (प्रतिनिधी )-
संपूर्ण देशामध्ये लॉक डाउन करण्यात आलेले आहे यामुळे अनेकजण घरी बसूनच विविध कामांमध्ये पुस्तक वाचनात अथवा इतर कार्यामध्ये आपले दिनचर्या घालवत आहे परंतु जिल्हा परिषद शाळा शिंदी तालुका भुसावळ येथील प्राथमिक शिक्षक समाधान जाधव हे आपल्या घरी गरीब व गरजवंत कुटुंबांसाठी खिचडी तयार करून पॅकिंग पार्सल तयार करून देण्याचे केले
भुसावळ येथील संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग भुसावळ चे आजी-माजी विद्यार्थी यांच्या स्माईल व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम वर्षभर राबवित असतात सध्या देश लावून असल्याने दररोज गोरगरीब मजूर गरीब फूटपाथवर राहणारे गरीब यांना जेवणाची अडचण निर्माण होते यासाठी स्माईल ग्रुपचे विद्यार्थी विविध लोकांकडून मदत घेऊन किंवा दान घेऊन त्यातून अन्नदान वाटप करत आहे हे अन्न शिजवण्याचे काम कुणीतरी एक कुटुंब करते त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गरजूंसाठी किमान 50 ते 70 लोकांना पुरेल एवढे खिचडी तयार करण्याचे साहित्य जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा शिंदी उपशिक्षक समाधान जाधव त्यांना दिले यानंतर समाधान जाधव हे स्वतः व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खिचडी स्वतः तयार केली आणि त्याची पॅकिंग करून स्माईल ग्रुप मेंबर रितेश घुले यांना दिले सदर स्माईल ग्रुपचे सदस्य भुसावळ शहरातील गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना ही खिचडी वाटप करत आहे शाळेमध्ये ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षक हे शहरातील भुकेले असलेल्या निर्वासितां चे पोट भरण्या काम करत असल्याने ही एक देश सेवा असल्याचे म्हटले जाईल या कार्याबद्दल त्यांच्या कुटुंबाचे व स्माईल व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक होत आहे.



