भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना वायरसचे संकट पुऱ्या विश्वावर आले आहे. आपल्या देशात पण याचा थैमान माजला आहे.महाराष्ट्र राज्यात देशाच्या अन्य राज्यांपेक्षा सर्वाधिक रूग्ण आहेत. जे रोजंदारी वर काम करुन पोट भरतात त्यांच्यावर उपाशी राहण्याची पाळी आली आहे. अश्या संकटाच्या काळात’ दि.३ एप्रिल सोमवारी रोजी सच्चानन्द गोधवानी,चेअरमन ऑ.फॅ. एम्प्लाइज क्रेडिट को.सोसायटी भुसावळ व सहका-यांतर्फे आयुध निर्माणी भुसावळ येथे राहणाऱ्या गरीब परिवारांसाठी तथा इतर गरजू गरीब कंत्राटी तत्वावर कार्य करतात अशा ९० परिवारांना प्रतेकी परिवारास ५ किलो तांदूळ,१ किलो दाळ,१ किलो तेल, गव्हाचे पीट ५ किलो, हळद,मिर्ची व धणे पावडर देण्यात आले. या प्रसंगी एस.के.मेहता, नवल पाटील,किशोर चौधरी, एम.एस.राऊत,प्रकाश कदम, प्रकाश नेमाडे,नीलेश पाटिल,पंकज पाटील,सुनील सोनवणे,सुभाष पाटील, महेंद्र साठे,संजय अहिरे,राम जाधव,गणेश सोनवणे, तरुण तेहलानी,प्रकाश पाटील व सोसायटी कर्मचारी उपस्थित होते.



