वरणगाव ( प्रतिनिधी )-
देशात कोरोना या विषाणुने थैमान घातला असुन संपुर्ण देशात लॉक डाऊन असल्याने इतर उद्योग धंदे बंद असुन देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे सर्वच शासकिय यंत्रणा कोरोना वर मात करण्यासाठी प्रयत्न करीत असताना आयुध निर्माणी वरणगाव कर्मचाऱ्यानी यासाठी पंतप्रधान साह्यात निधीत सुमारे ४८ लाख रुपये निधी देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
देशासह राज्यात कोरोना या आजाराचा चागलाच धक्का बसला असुन सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्वच उद्योगधंद्यावर आर्थीक मंदीचे सावट आहे संपूर्ण देशासह राज्यातील बरेच परिवार त्यामुळे घरातच बसुन आहेत .व त्याच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यासाठी आपणही काही देणे लागतो अशी खंत वरणगांव आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यांच्या मनात आली . म्हणून आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यानी या गोष्टीचे भान ठेवत आपण तर सरकारी कर्मचारी आहोतच त्यामुळे आपल्याला पगार मिळतच आहे मात्र जे गरिब हात मजुरी करणारे व हातावर पोट असलेल्या नागरिकासाठी आपण काही तरी केले पाहीजे या दृष्टीने आयुध निर्माणीतील सर्व कर्मचारी बांधवानी एकप्रकारे समाज ऋणातून उतराई होण्यासाठी खारीचा वाटा उचलत पंतप्रधान सहाय्यता निधीत सुमारे ४८ लाख६८ हजार ५५२ रुपयाचा धनादेश पंतप्रधान निधिस देऊन एक प्रकारे माणुसकीचे दर्शन घडविले आहे . त्यामुळे सर्व आयुध निर्माणी कर्मचारी बांधवाचे सर्व नागरिक तथा सामाजिक स्तरातून कौतूक होत आहे .



