वरणगाव( प्रतिनीधी )-
गेल्या दहा दिवसापासून राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असून संचारबंदी असतांना भुसावळ तालुक्यातील हतनुर गावात एक इसम गावठी हातभट्टी दारु विक्री करीत असतांना मिळून आल्याने त्याच्या विरुध्द वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
याबाबत पोलिसांना दिलेली माहिती अशी की वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांना गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी पीएसआय हर्षल भोये , पोहे कॉ मनोहर पाटील , प्रमोद कंखरे , राजेंद्र फालक या पथकाने हतनुर गावी जावून घनश्याम उर्फ घमा भगवान कोळी वय ४२ राहणार हतनूर हा त्याच्या घराच्या आडोश्याला गावठी हातभट्टी दारु विक्री करीत असतांना मिळून आला .मिळालेला माल प्लास्टीक वायरच्या पिशवित २०० प्लास्टीक पन्न्या त्यात सुमारे १२५ ते १५० एम एल असलेली गावठी हात भट्टी मिळून आली असता त्याला पोलिसांनी अटक केली आहे . तपास वरणगाव पोलिस करीत आहे .



