भुसावळ(प्रतिनिधी )-
येथील मॉर्डन रोड वरील मुख्य पोष्टातील कर्मचाऱ्यांचा व पोष्टमन लोकांचा सामान्य जनतेशी दैनंदिन संबंध असतो, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपायासाठी जय गणेश फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स तर्फे शुक्रवार ३ एप्रिल रोजी पोस्ट कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क तसेच सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी अध्यक्ष रो. उमेश नेमाडे, सचिव रो. राजेंद्र यावलकर, रो.सर्फराज तडवी,रो. गणेश फेगडे , पोस्टमास्टर सेलुकर व मोहन पाटील , जय गणेश फाउंडेशनचे सदस्य
रविंद्र पाटील, सूर्यकांत दुसाने आदीं उपस्थित होते .



