शिवपूर कन्हाळ्यात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर तालुका पोलिसांची धडक कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा, येथे शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी गावठी हातभट्टी अड्डयांवर तालुका पोलिसांनी धाड टाकून गावठी हातभट्टी दारू बनविन्याचे कच्चे रसायन सह तयार दारूसह आरोपी विरुद्ध कारवाई केली असून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला .
शिवपूर कन्हाळा येथे राहते घराच्या बाजूला 11 :45 वाजेच्या सुमारास चाँदखा चंदू गवळी याच्या ताब्यात महू नवसागर गूळ मिश्रीत कच्चे रसायनचे 4 ड्रम 800 लिटर आणि गावठी हात भट्टीची 35 लिटर तयार दारू अंदाजे किंमत 19 हजार 150 रुपये व मुद्देमाल जप्त केला .
यासह शिवपूर कन्हाळा येथेच 12:30 वाजेच्या सुमारास आरोपी बुध्दु गंगा गवळी हा जळत्या चालू भट्टीवर दारू तयार करत असताना व त्याच्या ताब्यात महू नवसागर मिश्रीत कच्चे व गरम
9 रसायन सह 05 ड्रम 900 लिटर आणि गावठी हात भट्टीची 30 लिटर तयार दारू अशी किंमत 32 हजार 200 रु किमतीचा मुद्देमाल मिळून आले त्यांच्या विरुद्ध प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि सुरु असलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भादवि कलम 270 ,271 ,188 अन्वये असे 2 गुन्हे दाखल केले. तसेच संचारबंदी नियम उल्लंघन केल्याबद्दल दोघांविरुद्ध कलम 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, सहाय्यक फौजदार सुनिल चौधरी, पोहेकॉ युनुस इब्राहिम शेख, विठ्ठल फुसे ,प्रवीण पाटील ,प्रेमचंद सपकाळे ,शिवाजी खंडारे ,यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *