भुसावळ (प्रतिनिधी )-
जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे आणि या करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी घोषित झाली आहे. १४ एप्रिल पर्यंत ही संचारबंदी असणार आहे आणि कदाचीत पुढे वाढेलही! परंतु, या दरम्यान रोजंदारीवर कामाला जाणारे हातावर पोट असणाऱ्या आणि बेघर नागरिकांसोर अडचणींचा मोठा डोंगर उभा झाला आहे. हाताला काम नसल्याने घरातील आहे ते राशनपाणी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुढचे १०/१५ दिवस कुटुंबाला जगवायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोज कमावून खाणाऱ्यांना आता काय खावे?, हा प्रश्न पडला आहे.
अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळच्या माध्यमातून संचारबंदीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी गरीब आणि गरजवंत कुटुंबाला जिवनावश्यक वस्तुंचे ( गहू, तांदूळ, डाळ, तेल, मीठ ) वाटप करण्यात येणार आहे.
संचारबंदिच्या काळात कुणीही गरीब उपाशी राहू नये, हीच या मागची शुद्ध भावना आहे आणि याला गरज आहे ती आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि मदतीची. आपल्या मदतीचा एक हात आणि हाक गरीब, गरजू कुटूंबाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटवू शकेल आणि त्यामुळे कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही.आपली ही छोटीशी मदत या कठीण प्रसंगातही त्यांच्या आयुष्यात जगण्यासाठी नविन उर्जा निर्माण करुन आशा पल्लवीत करत आहोत .यासाठी आपण आपली मदत गहू, तांदूळ, दाळ, तेल किवा रोख रक्कम स्वरूपातही देऊ शकता.
ज्यांना मदत स्वरूपात जे काही द्यायचे असेल त्यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानच्या स्वयंसेवक ज्ञानेश्वर घुले – 9420557753 ,संजय भटकर – 9423005276 , जीवन महाजन – 7588815384
प्रमोद पाटील- 8956606008 भूषण झोपे – 9969372188 अमित चौधरी – 9421741824
सचिन पाटील – 7304017217 संदीप रायभोळे -9284906169 संदिप सपकाळे -8421143530 समाधान जाधव-9022464981 मंगेश भावे – 9595848043, संदिप वसंतराव पाटील -7588009492 , 9209248392 यांचे कडे संपर्क साधावा असे आवाहन
आयोजकांनी केले आहे .



