कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील श्री गणेश कॉम्प्युटर्स शुल्‍काशिवाय मोफत सेवा देणार!

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील जामनेर रस्‍त्‍यावरील लक्ष्मी नगर,प्रिमीअर हॉटेल समोर श्री गणेश कॉम्‍प्युटर्स मध्ये आता सर्व बँकेचे पैसे काढणे,जमा करणे,वीज बिल,तात्काळ पैसे पाठविणे,फोन बिल,खाते उघडणे या सर्व सेवेचे उद्‍घाटन रेल कामगार सेनेचे भुसावळ मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांच्या हस्ते दि.३ रोजी करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व सुविधाला लागणारा अतिरिक्त शुल्‍क संचार बंदी असेपर्यंत मोफत करण्यात आला आहे.या वेळेस श्री गणेश कम्प्यूटर्सचे संचालक अमोल माळी,सत्यजीत वाणी,एमओएचचे कर्मचारी रणजीतसिंग चौधरी हे उपस्थित होते.कोरोणा व्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व नागरिक अतिशय द्विधा मनस्थितित आहे. परिस्थितिचे गांभीर्य ओळखून गणेश कम्प्यूटरचे संचालक अमोल माळी यांनी जनसेवा म्हणून कोरोना व्हायरस या महामारीचे संकट टळेपर्यंत सर्व नेट बेंकिंगचे व्यवहार विना कमीशनचे करण्यात येतील असा निर्धार व्यक्त केला आहे.तरी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच मो.9766388471, 9657075826 यावर संपर्क साधावा असे आवाहन ललितकुमार मुथा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *