भुसावळातील बँकांबाहेर सोशल डिस्टन्सचे तीन तेरा ; बँकेबाहेर एकच झुंबड ; सेवानिवृत्त पेंशनधारकांचे हाल

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोंकडाउन व संचारबंदी सुरू आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असल्या तरी नागरीक मात्र या ना त्या कारणाने घराबाहेर पडतच आहे . पोलिसांनी बहुतांशी वाहनधारकांवर गुन्हे दाखल करून व त्यांची वाहनेही जप्त केली आहे तरीही अजूनही नागरिकांची घराबाहेर पडण्याची वृत्त्ती कमी होत नाही . भाजी बाजार सहा ठिकाणी केला तरीही तेच तेच विदारक चित्र समोर दिसत आहे .रेशन दूकानांवर झालेली महिलांची तूफान गर्दी तर दुसरीकडे शहरातील विविध बँकांमध्ये पेन्शन घेण्यासाठी सेवानिवृत्त वृद्धाची गर्दी , तसेच विविध कामांसाठी नागरीकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याचे येथील विविध बँके समोर झालेल्या गर्दीमुळे दिसून आले आहे . बँक व पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे बँकेचे व्यवहार फार कमी झाले आहे , मात्र महीना संपला आज ३ एप्रिल पुन्हा शनिवार व रविवार बँकांना सूटी असेल खायचे काय य्या चिंतेने त्रस्त झालेल्या नागरिकांनी शहरातील यूनियन बँक, बँक ऑफ बड़ोदा , यासह अन्य बँकेबाहेर एकच झुंबड केली होती बँक व्यवस्थापनाने व पोलिसांनी याचे गांभीर्य ओळखून कारवाई करून सोशल डिस्टनसिंग पाळावे अशीही मागणी होत आहे .दुर्लक्ष केल्यास यामुळे कोरोना विषारी वायुचा प्रादुर्भाव रोखणे तर लांबच मात्र प्रसार नक्कीच वाढेल यात शंका नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *