भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाकडाऊन मुळे मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. यासाठी एक हात मदतीचा म्हणून भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे गरीब बांधवांना भोजन पाकिट वाटप करण्यात आले .
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड संदिप भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे जवळपास 70 ते 80 गरीब बांधवांना भोजन पाकिट शहर अध्यक्ष रविंद्र निकम , मागासवर्गीय विभागाचे प्रदेश समन्वय भगवान मेढे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी शहर सरचिटणीस शैलेश अहिरे,शहर सचिव सुकदेव सोनवणे,शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



