भुसावळ शहरातील बॅँकांमध्येही ठेवावे सोशल डिस्टन्स: शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- संचारबंदी कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बँकांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली पाहिजे, अनेक प्रकारच्या स्वच्छता, सेवा ,सक्तीच्या कराव्यात अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केली आहे.
शिवसैनिकांचे सोशल डिस्टन्सवर मार्गदर्शन:
आज दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्या पासून सर्वच बँकांत गर्दी झाली. पेंशन घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त होती. कोरोनामुळे जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो. गर्दी करणाऱ्या नागरिकांना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, पवन नाले, युवा सेना शहर प्रमुख सुरज पाटील, गणेश पाटील यांनी सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी आवाहन करीत नागरिकांना मार्गदर्शन केले . तसेच सेंट्रल बँकेच्या मॅनेजर सोबत चर्चा करून पेंशनसाठी एक ऐवजी चार काउंटर सुरू करायला सांगितले आहे. बँकेची वेळ ११ ते २ पेक्षा जास्त करून द्यावी अशी सूचना केली.
बॅकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निर्बंध लागू केले असून त्याअंतर्गत एकावेळी बॅकेत चार ते पाच ग्राहकांनाच प्रवेश द्यावा तसेच काऊंटरसमोर देखील ठराविक अंतरातच ग्राहक राहतील असे निर्देश आहेत. मात्र, त्यानंतर देखील अनेक बॅँका आणि एटीएम सेवा देताना काळजी घेत नसल्याचे दिसून आले. 
बँकने बसविले नियम धाब्यावर:
बँका आणि एटीएम मध्ये देखील सोशल डिस्टन्स ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. प्रत्येक ग्राहक किमान पाच फुटांचे सामासिक अंतर ठेवून बँकमध्ये व एटीएम बाहेर मार्किंग करावे. बँक एटीएमसाठी असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हँड ग्लोज वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. प्रत्येक बँक आणि एटीएम मध्ये प्रवेश करताना बँकेमार्फत सँनिटायझर उपलब्ध करून द्यावे. रांगेतील प्रत्येक व्यक्तीच्या हातावर सँनिटायझर टाकल्यानंतर त्याने हात स्वच्छ केल्यानंतरच बँकेत अथवा एटीएम येथे प्रवेशास परवानगी द्यावी. ज्या बँक व एटीएममध्ये जास्त गर्दी होते अशा बँकांनी बँकेबाहेर गर्दी नियंत्रणासाठी बँकेच्या व्यवस्थापनाने पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत. तसेच या नियोजनानुसार बँकांनी कामाचे तास व बँक बंद अथवा चालू ठेवण्याची वेळ याबाबत नियोजन करावे. तसेच आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे उलटपक्षी त्यांनी जास्तीत जास्त वेळ बँक एटीएम उघडे ठेवून नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे नियमच आहे पण हे सर्व नियम धाब्यावर बसवून बँकेत व्यवहार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *