वरणगावला प्रभाग दोन मध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी स्वतः केली सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी ; संपूर्ण प्रभागात 250 लिटर फवारणीला लागले तीन तास

वरणगाव (प्रतिनिधी ) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखन्यासाठी यावर उपाययोजना म्हणून येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी आज 29 रविवार रोजी संपूर्ण प्रभागात 250 लिटर सोडियम हायपोक्लोराईड या जंतुनाशक पावडरची स्वतः पाठीवर पंप बांधून फवारणी केली. या फवारणीला प्रभागात तब्बल तीन तास लागले.

कोरोना या जीवघेण्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत असून संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. कोरोनाच्या बचावासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रभाग क्रमांक दोन मधील मोठा माळी वाडा, गीदाडी आखाडा, भंगाळे वाडा, जावळे वाडा, गांधी चौक, सावकार गल्ली या भागात सुमारे 250 लिटर सोडियम हायक्लोराईड जंतुनाशक पावडरची फवारणी तीन तास करण्यात आली. स्वतः पाठीवर पंप बांधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी संपूर्ण प्रभागात फवारणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते राजेंद्र चौधरी, माळी समाजाचे अध्यक्ष सोपान माळी, दिनकर गंसाराम माळी, बापू रामदास माळी, जगन्नाथ माळी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी जमील खान टेलर, फिरोज खान, हाजी कलीमुद्दीन शेख, सय्यद अझहर, अजमल शेख, हाजी ताहेर मिर्जा, हाजी अय्युब खान,आवेस खान, विनोद माळी, भुषण माळी, प्रल्हाद माळी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी बाळा माळी, किरण माळी, अतुल माळी, सागर माळी, अविनाश माळी, पवन माळी, विवेक माळी, किशन माळी, संकेत माळी, तेजस माळी, श्याम माळी, उमेश माळी, सतीश माळी, प्रदीप माळी भैय्या माळी यांच्यासह शिवबा मंडळच्या कार्यकरत्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *