भुसावळचे नगरसेवक युवराज लोणारींनी स्व-खर्चाने केली प्रभाग आठ मध्ये फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रभागातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत नगरसेवक युवराज लोणारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वख़र्च करून संपूर्ण प्रभाग क्रमांक आठ मध्ये औषधांची फवारणी सुरू केली आहे. रस्ते, गेट, खिडक्या तसेच नागरीक वारंवार स्पर्श होणार्‍या ठिकाणी औषधांची फवारणी केली जात आहे. रोजंदारीने माणसे लावून चार पंपाद्वारे फवारणी सुरू करण्यात आली आहे. रविवारी प्रभागातील श्रीनगर, भोई नगर तसेच लोणारी समाज मंगल कार्यालयाच्या परीसरात फवारणी करण्यात आली शिवाय टप्प्या-टप्प्याने संपूर्ण प्रभागात फवारणी केली जाणार आहे.
नागरीकांनो घरातच थांबा
जळगावात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. कोरोनाचा विषाणू संसर्गजन्य असल्याने नागरीकांनी अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे तसेच घरातच थांबावे, असे आवाहन प्रभागातील नागरीकांना नगरसेवक युवराज लोणारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *