वरणगाव (प्रतिनिधी )- कोरोना व्हायरस मुळे संसर्ग वाढत असून हा वहायरस जास्त प्रमाणात पसरू नये म्हणून नगर परिषदेने गावात कीटकनाशक फवारणी साठी छोट्या ट्रॅक्टरवर माउंटेड स्प्रे बसून फवारणी सुरुवात केली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांचे प्रत्येक गावात कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने शहरात हातपंपाने फवारणी केली जात होती. परंतु त्यात कर्मचाऱ्यांना जास्त श्रम व काम कमी होत असल्याने दिनांक 27 रोजी नगर परिषदेच्या वतीने नगरअध्यक्ष सुनील काळे , मुख्याधिकारी श्याम गोसावी, आरोग्य अधिकारी गणेश चाटे, यांनी लवकरात लवकर शहरात फवारणी व्हावी यासाठी छोट्या ट्रॅक्टर वर २५० लिटर टाकी ठेवून त्याला स्प्रीकलरची जोडणी करूण त्यात २५o लीटर पाणी व ७ किलो ब्लिचिंग पावडर टाकून त्या मिश्रणाचे सोडियम हायपो क्लोराईड मिश्रण तयार करूण ते संपूर्ण गावातील मुख्य रस्त्यांवर, पेट्रोल पंपाच्या आजुबाजूला, समाज गृहांच्या आजुबाजूला, भाजी मंडी, मार्केट अशा सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी केली जाते आहे त्यामुळे शहरात होणारे रोगराईचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.


