वरणगावात आरोग्य विभाग पोलिस व पत्रकार यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनोखा उपक्रम ; नैवेद्यम हॉटेलतर्फे घरपोच भाजीपाला वाटप ;

वरणगाव (प्रतिनिधी )-
कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाचे आरोग्य विभाग पोलीस व पत्रकार बांधव युद्धपातळीवर काम करीत आहे त्यांना आपल्या परिवाराकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही किंबहुना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही याकरिता त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वरणगाव शहरातील नैवेद्यम हॉटेल चे व्यवसायिक माळी (लपालिकर) कुटुंबाने सात दिवस या कर्तव्यावर असलेल्या बांधवांसाठी मोफत भाजीपाला कांदे, बटाटे ,मिरची ,याचा पुरवठा घरपोहोच करणार असल्याचा निर्धार केला असून त्याची सुरुवात आजपासून ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशन येथुन करण्यात आली आहे .
ग्रामीण रुग्णालय मध्ये वैद्यकीय अधिकारी क्षीतिजा हेंडवे व त्यांचा कर्मचारी वर्ग तर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कुमार बोरसे व त्यांचा स्टॉफ उपस्थित होता
यावेळी हॉटेलचे मालक राजू माळी , अशोक माळी , अमोल माळी , सागर माळी , प्रमोद माळी , अभिजीत माळी , ऋषीकेश माळी , सुर्दशन माळी , शाम बाविस्कर आदी उपस्थित होते.
आपल्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर, पोलीस पत्रकारांसाठी व्यक्त केलेली कृतज्ञता याबाबत परिसरातून कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *