भुसावळ येथे सहा ठिकाणी भरणार भाजी बाजार ; सोशल डीस्टनसिंगचे पालन व्हावे – मुख्याधिकारी

भुसावळ (प्रतिनिधि)-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 4/5 लोक समूहाने एकत्र येऊ नये व सोशल डीस्टनसिंगचे पालन व्हावे म्हणून संचार बंदी दि १४ एप्रिल २०२० पर्यंत लागू करण्यात आली आहे.
यातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री यासाठी सुट देण्यात आली असून दिवसभर दुकाने उघडे राहतील तसेच गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भुसावळ शहराचे भाजीपाला खरेदी विक्री साठी खालील ६ ठिकाणी बाजाराची विभागणी करण्यात येत आहे . यामध्ये भुसावळ हायस्कुल, TV टॉवर ग्राउंडखडकारोड, नं 3 शाळा ग्राऊंड , दै आव्हान चौक रिंगरोड गडकरी नगर . सेंट अलंयसीएस चे बाजूला, मातृभूमी चौक या ठिकाणी बाजार भरेल .
तरी नागरिकांनी या ठिकाणी भाजीपाला खरेदी करावा गर्दी टाळावी व एकमेकात 1 ते 1.5 मीटर अंतर ठेवून उभे रहावे असे आवाहन पालिका मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *