संचारबंदी काळात रेल्वे कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान ;व्यापार्यांच्या सोयीसाठी विलंब व स्थान शुल्क मध्ये सूट ; मालवाहतुक गाडया सुरु

भुसावळ (प्रतिनिधी ) –
मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे जीवनावश्यक वस्तुंचा नागरिकांना व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी व्यापार्यांच्या सोयीसाठी विलंब व स्थान शुल्क मध्ये विशेष सूट देण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी मालवाहतुकीवर बारकाइने लक्ष ठेवून आहेत .
भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर संचारबंदी परिस्थितीत लोकांना जीवनावश्यक वस्तु मिळाव्या ,अन्न धान्य मिळावे याकरीता रेल्वे प्रशासनाने मालवाहतुक सुरु ठेवली आहे .
पंतप्रधान यानी संपूर्ण भारतात १४ एप्रिल२०२० पर्यंत लॉक डाउनचे आदेश दिले आहे . कोरोना वायरसच्या जीवघेण्या साथीमुळे सर्व प्रवासीरेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या आहे, मात्र केवळ माल वाहतुक गाड्या सुरु आहे, जिथे लोक आपल्या घरांमधे बंद आहे अशा भयंकर परिस्थित सुद्धा नियंत्रक कार्यालयातील कर्मचारी, स्टेशन प्रबंधक, ओएचई कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी , माल लिपिक भुसावळ विभागातील वेग वेगळ्या ठीकाणी दिवस रात्र काम करत आहे.
मध्य रेल्वे आपल्या अखंड माल वाहतुक सेवांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धतता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयंत्न करित आहे. रेल्वे प्रशासनाद्वारे व्यापार्यांच्या सोयीसाठी विलंब व स्थान शुल्क मध्ये सूट देण्यात आली आहे. देशासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी २४ तास सातत्याने काम केले जात आहे.
वरिष्टस्तरावरील अधिकाऱ्यां कडून माल वाहतुकीवर बारीक़ नजर ठेवली जात आहे. मध्य रेल्वे या कठिन काळात आपली महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *