बोर्डाची कामे पुढील तारखेपर्यंत स्थगित

वरणगाव (प्रतिनिधी )-
इयत्ता बारावीच्या परीक्षा झाल्या तर इयत्ता दहावी चा एक पेपर पुढे ढकलण्यात आला बोर्डाच्या वतीने झालेल्या पेपरचे तपासणी करण्याकरता व नियामक, परीक्षक यांची होणारी सभा कोरोना व्हायरसचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले असल्याचे आदेश बोर्डाचे विभागीय सचिव यांनी पत्राद्वारे कळविले आहे
पत्रात म्हटले आहे की नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, परिरक्षक व नियामक यांना कळविण्यात येतेकी राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाच टक्के इतकी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच नागरी भागात शासनाने कलम 144 लागू केलेले आहे त्या अनुषंगाने या कारणाखाली कामानिमित्त येणाऱ्या घटकांना सुचित करण्यात येते की नियामक परीक्षक यांची सभा उत्तरपत्रिका जमा करणे केंद्रसंचालक परिरक्षक फॉर्म नंबर 1 व 2 लॉट जमा करणे हिशोब पुस्तिका सादर करणे इत्यादी कामांसाठी पुढील आदेश येईपर्यंत मंडळ कार्यालयात उपस्थित राहू नये तसेच मंडळाचे वरील कामांसाठी संबंधित घटकाने कोणत्या दिनांकास मंडळात उपस्थित रहावे याबाबत सविस्तर नियोजन मंडळात यथावकाश कळवण्यात येईल असल्याचे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ चे विभागीय सचिव यांनी पत्राद्वारे कळविले आहे
सभा उत्तर पत्रिका जमा करणे स्थगित
नाशिक विभागीय मंडळामध्ये परीक्षक व नियामक यांच्या सभा होत्या त्याबाबत जिल्ह्यातून विचारणा होत होती तसेच सर्व प्रवासी वाहने बंद असल्याने तेथे जाणे अडचणी चे होते यासाठी नाशिक विभाग मंडळाचे अध्यक्ष के बी पाटील यांनी सर्व सभा व उत्तरपत्रिका जमा करण्याचे काम स्थगित केले असल्याचे सांगितले तसे पत्र देखील काढले आहे
जे के पाटील
जिल्हाध्यक्ष
मुख्याध्यापक संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *