कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वरणगावात विशिष्ठ समिती गठित ; विविध क्षेत्रातील शासकिय अधिकाऱ्यांचा सहभाग

वरणगाव, (प्रतिनीधी) – :
कोरोना व्हायरसचा सर्वत्र उन्माद सुरू असल्याने शासन स्थरावरून प्रादूर्भाव रोखण्यासाठि विविध योजनांचा वापर केला जात आहे मात्र पाहिजेत्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने शहरात विविध क्षेत्रातील शासकिय अधिकाऱ्यांच्या निदर्शनाखाली एक समिती गठित केली आहे समितीच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेऊन कारवाया केल्या जाणार आहेत
कोरोना व्हायरसच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असुन त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाचे जोरदार प्रयत्न देखील सुरु आहे कोरोना व्हायरस पासून संसर्ग निर्माण होणाऱ्या साखळीला वेळीच तोडण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नियोजना नुसार जिल्हाअधिकारी अविनाश ठाकणे यांचे आदेशाने ता. २२ रात्री १२ वाजेपासुन पुढिल निर्णया पर्यत नागरीकांच्या सुरक्षेकरीता कलम१४४नुसार संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने वरणगावात सुध्दा जिवनावश्यक दुकाने सोडून बंद पाळणे, पांच पेक्षा अधिक लोकांनी जमाव तयार करून चर्चा करू नये, प्रवासी वाहतूक करणारी वाहने बंद ठेवावी, घरांबाहेर कोणी हि फिरू नये कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते आणि आपल्या पासुन दुसऱ्याला अशी एक वेगळी चैन निर्माण होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे अशा खबरदाऱ्या घेतल्या जात आहेत. मात्र नागरीकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने वरणगाव पोलिस स्टेशनला बैठक घेण्यात आली बैठकीत नगर परिषदेचे नगर अध्यक्ष सुनिल काळे, मुख्याधिकारी शामकुमार गोसावी, वैद्यकिय अधिकारी देवषी घोषाल,कार्यकारी अधिकारी विशाल सुर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे,तलाठी कल्पना गोरले व स्थानिक पत्रकार आणि नगर परिषदेचे कर्मचारी अशी एक समिती गठित केली आहे या समितीच्या माध्यमातून कोरोना संदर्भातील नागरीकांच्या मनातील भिती काढणार आहेत शहरातील प्रादुर्भाव रोखण्या साठि विविध उपाययोजना करणार आहेत संचारबंदीचे आदेश न पाळणाऱ्यांवर समितीच्या माध्यमातून तक्रार करणार असुन त्यावर वरणगाव पोलिस कोणाची हि गय न करता कायदेशीर कारवाई करणार असल्याचे समितीमार्फत नियोजन करण्यात आले यावेळी पोलिस स्टेशन, नगर परिषद, महसुल विभाग, आरोग्य विभाग असे सर्व कर्मचारी व शहरातील रिक्षा युनियनचे पदाधीकारी, उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *