रावेर (प्रतिनिधी ) रावेर शहरात 22 रोजी जनता कर्फ्यू दरम्यान रात्री 8.30 वाजेचे सुमारास दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली . , बारीवाडा, शिवाजी चौक, मान्यारवाडा, संभाजी चौक, कोतवालवाडा भागात जाळपोळ ;
मशीद व आवाजी महाराज मंदिरावर समाज कंटकांची दगड फेक केली यात दिगंबर अस्वार जखमी झाले असून रुग्णालयात दाखल आहे . शहरातील छ.शिवाजी महाराज चौकात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. आज देशभरात कर्फ्यू लागू असतांना घडलेला प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी स्थानिक पोलीसांनी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, जनता कर्फ्यू मध्ये संपूर्ण रावेर नागरिक सहभागी झाले . या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला.
मात्र आज 22 रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रावेर शहरातील शिवाजी चौकात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली.त्तर डीपी जाळल्याने विज प्रवाह खंडित झाला आहे .दरम्यान आज झालेल्या दगडफेकमुळे प्रचंड प्रमाणावर खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तत्काळ आपल्या पथकासह घटनस्थळी दाखल झाले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.



