कपिलनगर येथे कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आढळले दीपनगर, निंभोरा, पिंप्रीसेकमला खळबळ

दीपनगर (वार्ताहर) – दीपनगर जवळच असलेल्या कपिलनगर येथे मुंबईहुन आलेल्या दोघांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. हे दोघे बापलेके असुन ते मुंबई येथे कामासाठी गेलेले होते. दिनांक 21 मार्च रोजी हे दोघे मुंबई येथून घरी कपिलनगरला रात्री पोहोचले होते. सकाळी या दोघांना खोकला, सर्दी,ताप ,श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे दिसून आले. यामुळे रहिवाशांनी तत्काळ वरणगाव पोलिस, आणि रूग्णालयात संपर्क साधला. जवळपास दोन तासांनी 108 नंबर ची रूग्णवाहीका आल्यानंतर त्यांना वरणगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामस्थांनी या दोघांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनाही तपासणी साठी घेऊन गेले. या सर्वांची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर फक्त दोघे बापबेटे यांनाच कोरोनाची लक्षणे दिसून आले म्हणुन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले. आणि इतर सदस्य यांना कोणतेही लक्षणे दिसून आले नाही म्हणून त्यांना घरी पाठविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *