कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करण्याची राष्ट्रवादी ची मागणी

वरणगाव- संपुर्ण जगभर थैमान माजवणारा कोरोना व्हायरसवर उपययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नगरसेवक यांनी वरणगाव पालिकेला निवेदन देऊन मागणी केली आहे.
कोरोना या विषारी व जिवघेण्या आजारावर उपाययोजने करीता शासन स्तरावर विविध प्रकारच्या सुचना देऊन नागरिकाना सतर्क राहण्याचे देत आहे त्याच प्रमाणे शहरातही नगर परिषदे कडून मोफत मास्क वाटप करणे , सॅनिटायझर पुरवणी अशा सुविधा नागरिकाना देऊन शहरात स्वच्छता राबविणे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नगर सेवक राजेद्र चौधरी , रविन्द्र सोनवणे , विष्णु खोले, समाधान चौधरी गणेश चौधरी यानी नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक यांना निवेदन देऊन केली आहे
प्रतिभा नगरात मास्क वाटप
कोरोना या विषाणु आजारावर उपाय योजनेसाठी साठी प्रतिभा नगर मधील रहिवाशी जावेद शाह यांनी दुपारी नमाज पठाण झाल्यानतंर गावा पर्यत पोहचलेल्या विषारी कोरोना विषाणुची बाधा होऊ नये या साठी नागरिकाना मास्क वाटप करीत हा माझा छोटासा प्रयत्न असल्याचे सागत शहरातील नागरिकानी सावध राहण्याचे सागीतले .यावेळी फयुमशेठ , कदिर पठान , महेबुब पिजारी , रहेमान शाह , फजल , सलीम शाह , अलीम भाई , रेहान कुरेशी , अकबर शाह , सईद खाटीक , इमरान शाह आसिफ शाह , पंडित तायडे , शाकीर जकातदार , इजामान शेख इ नागरिक उपस्थीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *